ठळक बातम्या

डोंबिवली पूर्व भागातील धोकादायक इमारत कोसळली – दोन जण अडकले असण्याची शक्यता

डोंबिवली दि.१५ :- डोंबिवली पूर्व भागातील आयरेगावात आज संध्याकाळी आदिनारायण भुवन ही तळ अधिक तीन मजली धोकादायक इमारत कोसळली. ही इमारत अनधिकृत आणि धोकादायक असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. ही इमारत लोड बेअरिंग पद्धतीने बांधण्यात आली होती.

थायरॉईड विषयक उपचारासाठीची अत्याधुनिक सूक्ष्म शस्त्रक्रिया महापालिका रुग्णालयांत यशस्वी
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन बचावाचे कार्य सुरू केले. महापलिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी भेट दिली.

शिवकालीन किल्ले केवळ महाराष्ट्राचाच नाही तर संपूर्ण देशाचा जिवंत सांस्कृतिक वारसा – राज्यपाल बैस

दरम्यान कोसळलेल्या इमारतीच्या ढिगा-याखाली दोन जण अडकले आहेत , अशी माहिती या ठिकाणी राहणारे रहिवासी नरेंद्र मिस्त्री यांनी मुंबई आसपास शी बोलताना दिली.‌ घटनास्थळी एनडीआरफ, टीडीआरएफचा चमू मदतकार्यासाठी उपस्थित असून ढिगारा हटविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.‌

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *