ठळक बातम्या

थायरॉईड विषयक उपचारासाठीची अत्याधुनिक सूक्ष्म शस्त्रक्रिया महापालिका रुग्णालयांत यशस्वी

मुंबई दि.१५ :- थायरॉईडच्या ग्रंथीच्या आजाराने घशाला येणाऱ्या सुजेमुळे खाण्यापिण्यासाठी त्रास होणार्‍या एका ३२ वर्षीय महिलेवर ‘मायक्रोवेव्ह एब्लेशन’ (एम. व्ही. ए.) या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बृहन्मुंबई महापालिकेच्या के. बी. भाभा रुग्णालयात अवघ्या दहा मिनिटात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. महापालिकेच्या रुग्णालयांत पहिल्यांदाच या तंत्रज्ञानाचा वापर थाॅयराईडविषयक उपचारासाठी करण्यात आला, अशी माहिती उपनगरीय रुग्णालयाच्या प्रमुख वैद्यकीय अधीक्षिका डॉ. विद्या ठाकूर यांनी दिली.

कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना पथकर माफ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय

भाभा रुग्णालयातील ज्यांनी ही शस्त्रक्रिया केली त्या कान नाक व घसा विभागातील डॉ. आम्रपाली पवार यांनी सांगितले, भाभा रुग्णालयातील कान नाक व घसा विभागात काही दिवसांपूर्वी घशाच्या दुखण्यामुळे त्रस्त असलेली ३२ वर्षीय संगीता (नाव बदललेले) ही महिला उपचारासाठी आली. सदर महिलेची वैद्यकीय तपासणी केली असता, त्यांच्या घशातील थायरॉईड ग्रंथींना मोठ्या प्रमाणात सूज असल्याचे आढळून आले. अशा प्रकारची सूज असल्यास सामान्यपणे गळ्यावर छेद देऊन शस्त्रक्रिया करण्यात येते. अशाप्रकारे करण्यात येणारी करण्यात येणारी शस्त्रक्रिया ही नाजूक व अवघड अशी शस्त्रक्रिया मानली जाते. शस्त्रक्रियेला साधारणपणे दोन तास एवढा कालावधी लागतो.

शिवकालीन किल्ले केवळ महाराष्ट्राचाच नाही तर संपूर्ण देशाचा जिवंत सांस्कृतिक वारसा – राज्यपाल बैस

तसेच शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला काही दिवसांपर्यंत रुग्णालयात राहणे आवश्यक असते. त्याचसोबत चालणे – फिरणे – खाणे इत्यादीवर बंधने असतात. या शस्त्रक्रियेमुळे गळ्यावर तयार होणारे व्रण हे आयुष्यभर राहतात‌. या सर्व बाबी लक्षात घेऊन सदर महिलेवर अत्याधुनिक एम. व्ही. ए. पद्धतीची सूक्ष्म शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि ही शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली. शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी रेडिओलॉजी विभागाचे डॉक्टर रितेश खोडके, सिस्टर श्रीमती लिना नाईक आणि शस्त्रक्रिया गृहातील सहाय्यक किशोर कांबळे यांचे विशेष सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *