मागाठाणे मेट्रो स्थानकाचे उत्तरेकडील प्रवेशद्वार दोन महिन्यांनंतर खुले
मुंबई दि.१३ :- ‘दहिसर ते गुंदवली मेट्रो ७’ मार्गिकेतील बोरिवली येथील मागाठाणे मेट्रो स्थानकाचे उत्तरेकडील प्रवेशद्वार दोन माहिन्यांनंतर खुले करण्यात आले.
चारित्र्य आणि दृष्टीकोन उत्तम राहण्यासाठी चांगले वाचन गरजेचे – दीपक केसरकर
मागाठाणे मेट्रो स्थानकालगत एका खासगी विकासकाच्या कामादरम्यान रस्ता खचल्याची घटना जुलै महिन्यात घडली होती. मेट्रो स्थानकाच्या उत्तरेकडील प्रवेशद्वारालगत हा रस्ता असल्याने महामुंबई मेट्रो संचलन महामंडळाने (एमएमएमओसीएल) हा परिसर बंद केला होता.
धार्मिक चिन्हांमधून प्रक्षेपित होणार्या स्पंदनांचा अभ्यास आवश्यक – शॉर्न क्लार्क
त्यामुळे स्थानकाच्या उत्तरेकडील एक प्रवेशद्वारही बंद ठेवण्यात आले होते. बृहन्मुंबई महापालिकेने रस्त्याची, परिसराची दुरुस्ती केली. त्यानंतर आता हे प्रवेशद्वार सुरू करण्यात आले आहे.