मध्य रेल्वेच्या ११ धिम्या लोकल दादरऐवजी परळपर्यंत चालविणार
दादर फलाट क्रमांक १ ची रुंदी वाढविण्यात येणार
मुंबई दि.१३ :- दादर रेल्वे स्थानकावरील गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने ११ धिम्या लोकल दादरऐवजी परळपर्यंत चालविण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या या लोकल दादरच्या फलाट क्रमांक दोनवर येतात. येत्या १५ सप्टेंबरपासून परळपर्यंत धावतील आणि तेथूनच डाऊन दिशेकडे रवाना होणार आहेत.
मागाठाणे मेट्रो स्थानकाचे उत्तरेकडील प्रवेशद्वार दोन महिन्यांनंतर खुले
दादर स्थानकातील गर्दीचे व्यवस्थापन आणि प्रवाशांच्या सोयीसाठी दादर फलाट क्रमांक १ च्या फलाटाची रुंदी वाढविण्यात येणार आहे. हे काम १५ सप्टेंबरपासून सुरू होणार असून साधारण पुढील दोन महिन्यांत ते पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यासाठी एक कोटी रुपये खर्च येणार आहे.
धार्मिक चिन्हांमधून प्रक्षेपित होणार्या स्पंदनांचा अभ्यास आवश्यक – शॉर्न क्लार्क
दादर येथील फलाट क्रमांक १ चे रुंदीकरण आणि दादर फलाट क्रमांक २ बंद केल्यामुळे दादरपासून सुरू होणाऱ्या सेवा परळपर्यंत विस्तारित केल्या जातील. तसेच दादर येथून सुटणाऱ्या लोकल परळ येथून सुटतील, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.