‘आयआरसीटीसी’च्या संकेतस्थळावर लवकरच एसटीचेही तिकीट आरक्षित करता येणार
मुंबई दि.१३ :- इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन अर्थात आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर प्रवाशांना लवकरच एसटीचेही तिकीट आरक्षित करता येणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची ऑनलाईन बस बुकिंग सेवा सक्षम करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्याची घोषणा आयआरसीटीसीने केली आहे.
मध्य रेल्वेच्या ११ धिम्या लोकल दादरऐवजी परळपर्यंत चालविणार
https://www.bus.irctc.co.inया संकेतस्थळावर एसटीचे तिकीट आरक्षित करता येणार आहे. आयआरसीटीसी आणि एसटी महामंडळ यांच्यातील सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाल्याने प्रवाशांना प्रवासाची व्यवस्था एकाच ठिकाणी आणि सुलभ पद्धतीने करता येणार आहे.