मध्य-कोकण रेल्वेच्या आणखी चार गाड्यांना प्रत्येकी दोन आणि दिवा-चिपळूण मेमूला चार डबे
कोकणात २२ डब्यांच्या आठ रेल्वेगाड्या धावणार
मुंबई दि.१३ :- गणेशोत्सवानिमित्त मध्य-कोकण रेल्वेने आणखी चार रेल्वेगाड्यांना प्रत्येकी दोन डबे आणि दिवा-चिपळूण मेमूला चार डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे यंदा कोकणात २२ डब्यांच्या आठ रेल्वेगाड्या धावणार असून, गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
‘आयआरसीटीसी’च्या संकेतस्थळावर लवकरच एसटीचेही तिकीट आरक्षित करता येणार
गाडी क्रमांक ०११६५/६ लोकमान्य टिळक टर्मिनस ते मंगळुरू लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस (१६ फेऱ्या), गाडी क्रमांक ०११६७/८ लोकमान्य टिळक टर्मिनस ते कुडाळ- लोकमान्य टिळक एक्स्प्रेस (२४ फेऱ्या) रेल्वे गाड्यांना प्रत्येकी दोन डबे जोडण्यात येणार आहेत.
मध्य रेल्वेच्या ११ धिम्या लोकल दादरऐवजी परळपर्यंत चालविणार
गाडी क्रमांक ०११५५/६ दिवा-चिपळूण-दिवा मेमूला (३६ फेऱ्या) प्रत्येकी चार डबे जोडण्यात येणार आहे. यामुळे आठ डब्यांची मेमू आता १२ डब्यांची धावणार आहे. गाडी क्रमांक ०११५१/२ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मडगाव-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि ०११७१/२ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -सावंतवाडी रोड-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या दोन्ही गाड्यांच्या २२ फेऱ्या २२ डब्यांच्या चालवण्याचा निर्णय मध्य आणि कोकण रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.