‘आयुष्मान भव’ मोहिमेत महाराष्ट्र देशात उत्कृष्ट काम करेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यातील मोहिमेचा राज्यपाल, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
मुंबई दि.१३ :- देशवासियांच्या निरोगी आयुष्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आयुष्मान भव: मोहिमेची सुरूवात राज्यभर केली जाणार आहे. या मोहिमेत महाराष्ट्र देशात उत्कृष्ट काम करून नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली.
मध्य-कोकण रेल्वेच्या आणखी चार गाड्यांना प्रत्येकी दोन आणि दिवा-चिपळूण मेमूला चार डबे
आजपासून देशात आयुष्मान भवः मोहिमेस सुरुवात झाली असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशपातळीवर या मोहिमेचा शुभारंभ केला. राज्यातील मोहिमेचा शुभारंभ सह्याद्री अतिथीगृह येथे राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, आमदार भरत गोगावले, मनीषा कायंदे यावेळी उपस्थित होते.
‘आयआरसीटीसी’च्या संकेतस्थळावर लवकरच एसटीचेही तिकीट आरक्षित करता येणार
राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून नागरिकांना भक्कम आधार देण्यात आला. गेल्या वर्षभरात १०० कोटीं रुपयांहून जास्त मदत देण्यात आली आहे. सर्व सरकारी रुग्णालयांत रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा देण्याचा निर्णय आपण घेतला. महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री आरोग्य योजनेअंतर्गत एकत्रितपणे २ कोटी कार्ड वाटण्यात येणार आहेत, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
मध्य रेल्वेच्या ११ धिम्या लोकल दादरऐवजी परळपर्यंत चालविणार
याप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमात उल्लेखनीय काम केलेल्या “निक्षय मित्र” व जिल्ह्यांना देखील गौरविण्यात आले तसेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री आरोग्य या एकत्रित योजनेच्या कार्ड वाटपास सुरुवात करण्यात आली.