जात बदनाम होऊ नये, म्हणून मी दोन पावले मागे हटत आहे – मनोज जरांगे पाटील
शासनापुढे पाच अटी ठेवल्या, उपोषण सुरूच
मुंबई दि.१२ :- जात बदनाम होऊ नये, म्हणून मी दोन पावले मागे हटत आहे. आत्तापर्यंत आपण ४० वर्ष दिली आता एक महिना देऊ या. यानंतर टिकणारे आरक्षण मिळेल, असे मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी आज दुपारी सांगितले. जरांगे यांचे २९ ऑगस्टपासून उपोषण सुरु असून आज उपोषणाचा १५ वा दिवस आहे.
मुंब्रा रेतीबंदर परिसरात स्फोटकांचा साठा जप्त
पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आटली बाजू पुन्हा सगळ्यांसमोर मांडली. मराठा आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत घरी जाणार नाही, मी माझी जागा सोडणार नाही. महिन्याभरात सरकारने आरक्षण दिले नाही तर सरकार तोंडावर पडेल, असे जरांगे म्हणाले.
लोकायुक्तांकडून राज्यपालांना वार्षिक अहवाल सादर
उपोषण सोडताना मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी यांनी उपोषणस्थळी यावे, अशी अटही जरांगे पाटील यांनी टाकली आहे. दरम्यान संभाजी भिडे गुरुजी यांनी आज जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांना उपोषण समाप्त करण्याची विनंती केली. मराठा आरक्षणाबाबत राज्य शासन सकारात्मक आहे, असे भिडे गुरुजी यांनी त्यांना सांगितले.