मुंबई, ठाणे, डोंबिवली, कल्याण परिसरात पुन्हा पाऊसधारा
मुंबई दि.०७ :- गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने आज मुंबई शहर आणि उपनगरांहह ठाणे, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर परिसरात जोरदार हजेरी लावली. सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे.
कुणबी दाखले देण्याकरिता कार्यपद्धती निश्चितीसाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती
गुरुवारपासून पुढील दोन ते तीन दिवस बहुतांश भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणातील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. आज सर्वत्र दहिहंडी उत्सव साजरा करण्यात येत असून पाऊसधारांमुळे गोविंदा पथकांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे.
मेट्रो कारशेडसाठी मोघरपाडातील जागा एमएमआरडीएला हस्तांतरीत करण्यात येणार
अर्थात संततधार पावसामुळे गोविंदा पथकांना परिसरातून मार्गस्थ होताना काही अडथळ्यांचा सामना करावा लागला. मुंबई शहर तसेच उपनगरात गुरूवारी पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली. सकाळपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे वातावरणात काही प्रमाणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे.