काँग्रेसच्या राज्यव्यापी जनसंवाद पदयात्रेला सुरुवात
मुंबई दि.०३ :- शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी, महिला तरुण कामगार असे सर्वच समाजघटक केंद्रातील मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे अडचणीत आले आहेत. दुष्काळी परिस्थितीमुळे राज्याच्या विविध भागातील खरिपाचे पीक वाया गेल्याने शेतकरी उध्वस्त झाला आहे. पण सरकारकडून कोणताही दिलासा मिळत नाही त्यामुळे राज्यातील जनता हवालदिल झालेली आहे.
मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जच्या घटनेचे राज्यभरात पडसदार
या जनतेशी संवाद साधण्यासाठी त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी व त्यांना आधार देण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या विभाग निहाय राज्यव्यापी जनसंवाद पदयात्रेला आजपासून सुरुवात झाली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज वर्धा जिल्ह्यातील आष्टी येथील शहीद स्मारकाला अभिवादन करून विदर्भातील जनसंवाद यात्रेला सुरुवात केली. विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज नागपूर शहरातून जनसंवाद पदयात्रा काढली.
भिवंडीत दोन मजली इमारत कोसळून दोघांचा मृत्यू, पाच जण जखमी
विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते, माजी मंत्री आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यात जनसंवाद पदयात्रा निघाली. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात हे सोमवारी सकाळी अहमदनगर शहरातील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यापासून उत्तर महाराष्ट्रातील जनसंवाद पदयात्रेला सुरुवात करणार आहेत.