Skip to content
कल्याण दि.२५ :- नमस्कार मंडळातर्फे कल्याण परिसरातील ८५ शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सहकार्याने एक कोटी सूर्यनमस्काराचा लक्षांक पूर्ण करण्यासाठीच्या उपक्रमाला सुरूवात झाली आहे. येत्या १५ सप्टेंबरपर्यंत हा उपक्रम सुरू राहणार आहे.
कल्याण, टिटवाळा भागातील शाळा या उपक्रमात सहभागी झाल्या आहेत. माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या पुढाकाराने हा उपक्रम यावेळी सुरू करण्यात आला आहे.
नमस्कार मंडळ, स्वानंद नगर व्यायामशाळेत दररोजच्या सूर्यनमस्कारासाठी सोय करण्यात आली आहे. हा उपक्रमत देश, जागतिक पातळीवर नेण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत.