Skip to content
नवी मुंबई दि.२५ :- नवी मुंबईलगत औद्योगिक वसाहतीतील झोपडपट्ट्यांसाठी पुनर्वसन योजना लागू करण्यासाठी तत्वतः मंजुरी देण्यात आली. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासमवेत काल मंत्रालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. नवी मुंबई महापालिका आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण संयुक्तपणे हे काम करणार आहेत.
शिवसेना उपनेते विजय नाहटा, शिवसेनेचे नवी मुंबई जिल्हा प्रमुख विजय चौगुले , एमआयडीसी आणि सिडकोचे अधिकारी तसेच नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यावेळी उपस्थित होते. आद्योगिक वसाहतअंतर्गत दिघा ते नेरुळ शिवाजीनगरपर्यंत ही झोपडपट्टी आहे. महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी झोपडपट्टी पुनर्वसनासाठी बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत.