Skip to content
मुंबई दि.२३ :- ठाणे ते बोरिवली भुयारी मार्ग (दुहेरी बोगदा) प्रकल्पाच्या कामाचे व्यवस्थापन करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्याचा निर्णय घेतला आहे.
यासाठी नुकत्याच निविदा जारी करण्यात आल्या आहेत. भुयारी मार्गात १०.२५ किलोमीटर लांबींच्या दोन बोगद्यांचा समावेश आहे. एमएमआरडीएने या प्रकल्पाचा नव्याने आराखडा तयार केला असून प्रकल्पाचा खर्च११,२३५.४३ कोटी रुपयांवरून १६,६००.४० कोटी रुपयांवर गेला आहे.