नॅशनल बुक ट्रस्टच्या अध्यक्षपदी प्रा.मिलिंद मराठे
ठाणे, दि. १७
नॅशनल बुक ट्रस्टच्या अध्यक्षपदी ठाणेनिवासी प्रा.मिलिंद मराठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोमय्या महाविद्यालयात दीर्घकाळ प्राध्यापक म्हणून काम केलेल्या प्रा. मराठे यांचे शालेय शिक्षण ठाण्यातील सरस्वती विद्यालयात झाले.
मराठे इयत्ता दहावी आणि बारावीच्या गुणवत्ता यादीत झळकले होते. अभियांत्रिकी शिक्षण प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी काही वर्ष कोल्हापूर, राजस्थान येथे विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून पूर्णवेळ सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम केले.
नेटसेट परिक्षा उत्तीर्ण होऊन त्यांनी अध्यपनाचे काम केले. विविध शैक्षणिक समित्यांवर ते कार्यरत होते. नवीन शैक्षणिक धोरणाचे अभ्यासक असलेले प्रा.मराठे त्याच्या अंमलबजावणीच्या प्रक्रियेत आहेत.
—–