Skip to content
पुढील महिन्यात?
मुंबई दि.१८ :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा तसेच पक्षाचे नाव पक्षाच्या चिन्हाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाकडून पुढील महिन्यात निकाल लागणे अपेक्षित आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मधून अजित पवार यांचा गट बाहेर पडल्यानंतर या गटाने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातील आमदार आणि खासदारांच्या मिळून अशा ४०जणांचे प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाकडे दाखल केले आहे.
निवडणूक आयोगाकडून शरद पवार गट आणि अजित पवार गट या दोघांना आपले म्हणणे सादर करण्यासाठी १७ ऑगस्टपर्यंत मदत केली होती. ही मुदत काल संपली. मात्र शरद पवार गटाला त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी आणखीन तीन आठवड्यांची मुदत दिली आहे. आता येत्या ८ सप्टेंबरपर्यंत आपली बाजू सादर करण्याची सूचना निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला केली आहे. निवडणूक आयोगाकडून नेमका काय निर्णय दिला जातो याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.