Skip to content
महापालिकेकडून सुधारित हमीपत्र जारी
मुंबई दि.११ :- सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी गणेशमूर्तींची उंची आणि पर्यावरणपूरक मूर्तींची अट काढून टाकण्यात आली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून भरून घेण्यात येणा-या हमीपत्रात काही दुरुस्ती करून सुधारित हमीपत्र तयार करण्यात आले आहे, असे बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
जुन्या हमीपत्रात ‘प्रतिष्ठापना करत असलेली चार फुटांपर्यंतची मूर्ती शाडू, पर्यावरणपूरक साहित्याने साकारलेली असेल, हे आम्हाला मान्य असेल,’ अशी अट होती. त्यामुळे मंडप परवानगीसाठी सुरू करण्यात आलेले ऑनलाइन अर्ज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून सादर करण्यात आले नाहीत. या हमीपत्रातील अटींवरून मंडळांमध्ये गोंधळ निर्माण झाला. अखेर गुरुवारी महापालिकेने नवीन परिपत्रक जारी करून ही अट काढून टाकली.