उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेतला
मुंबई दि.१० :- ‘सह्याद्री’ अतिथीगृह येथे आज आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी वित्त व नियोजन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून राज्याच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेतला. महसुलात वाढ करण्यासाठी आयोजित जीएसटी, व्हॅट, मुद्रांक व नोंदणी शुल्क, राज्य उत्पादन शुल्क, परिवहन, ऊर्जा, उद्योग विभागांचे अधिकारी बैठकीस उपस्थित होते.
व्यावसायिकाच्या अपहरण प्रकरणी आमदार प्रकाश सुर्वेंच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल
वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, उद्योग (खनिकर्म) विभागाचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशिष शर्मा, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, राज्य कर आयुक्त राजीव मित्तल, राज्य उत्पादन शुल्क आयुक्त विजय सुर्यवंशी, नोंदणी महानिरिक्षक हिरालाल सोनावणे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.