व्यावसायिकाच्या अपहरण प्रकरणी आमदार प्रकाश सुर्वेंच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल
मुंबई दि.१० :- बंदुकीचा धाक दाखवून व्यावसायिकाचे अपहरण केल्याप्रकरणी शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वेंसह पाच जणांवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इयत्ता अकरावीच्या तिसऱ्या विशेष फेरीत १३ हजार विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळाले
राजकुमार सिंह असे गुन्हा दाखल केलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. सिंह यांनी सांगितल्यानुसार, बुधवारी गोरेगाव पूर्व येथील कार्यालयातून त्यांना जबरदस्तीने उचलून नेण्यात आले. नंतर पाटणा येथील व्यावसायिक मनोज मिश्राला दिलेलं कर्जाचं प्रकरण मिटवण्याची धमकी देण्यात आली.