चित्रपट, रंगभूमी महामंडळाकडून १ कोटी ३४ लाख रुपयांचा लाभांश शासनाला सुपूर्द
मुंबई दि.०९ :- महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने २०२१-२२ या वित्तीय वर्षाचा १ कोटी ३४ लाख १५ हजार ७३३ रुपयांच्या लाभांशाचा धनादेश राज्याचे सांस्कृतिक मंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, व्यवस्थापकीय संचालक डॉ. अविनाश ढाकणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बुधवारी मंत्रालयात सुपूर्द केला.
ज्येष्ठ विचारवंत, व्याख्याते हरी नरके यांचे निधन
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे आदी यावेळी उपस्थित होते. महामंडळाची स्थापना कंपनी कायद्यानुसार झाली असून निव्वळ नफ्याच्या किमान ५ टक्के लाभांश महामंडळाकडून शासनाला देण्यात येत आहे. २००४ पासून शासनालला लाभांश दिला जात असून आतापर्यंत १२ कोटी ७३ लाखाचा लाभांश शासनाला देण्यात आला आहे.अशी माहिती महामंडळाचे वित्तीय लेखा अधिकारी राजीव राठोड यांनी दिली.