कल्याण पूर्व आणि पश्चिम भागाचा पाणीपुरवठा मंगळवारी बंद
कल्याण दि.०५ :- कल्याण शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या बारावे येथील जलशुध्दिकरण केंद्रात मंगळवारी ( ८ ऑगस्ट) यांत्रिक आणि विद्युत देखभालीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे या दिवशी सकाळी आठ ते रात्री आठ वेळेत कल्याण पूर्व, पश्चिम भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
‘महाडीबीटी’तर्फे मिळणारा लाभ नाकारण्यासाठी दोन महिन्यात व्यवस्था – उपमुख्यमंत्री अजित पवार
मंगळवारी पाणी पुरवठा बंद राहणार असल्याने दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.