Dombivli : टिळकनगर बाल विद्यामंदीरात ‘विना दप्तरा’ ची शाळा रंगली!
डोंबिवली, दि. २८
डोंबिवलीतील टिळकनगर बाल विद्यामंदिरामध्ये नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने ‘विना दप्तराची शाळा’ उपक्रम राबविण्यात आला.
विधिमंडळ पावसाळी अधिवेशन ४ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
उपक्रमांत पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांच्या इंग्लिश शब्दांच्या भेंड्या, अक्षरकार्डच्या आधारे शब्द बनवणे अशा भाषिक कृती तसेच मणी, काडेपेटीतील काड्या यावर आधारलेल्या खेळातून हसत खेळत दशक-एकक संकल्पना दृढ करण्यात आल्या. संख्याकार्डाच्या आधारे संख्याची ओळख व वाचन तसेच दोरा, रंगीत कागद वापरून भौमितिक आकारही तयार केले.
राज्यात सरासरीच्या १०४ टक्के पाऊस पेरण्या ८५ टक्के….
विद्यार्थ्यांनी त्यांचे विचार स्पष्ट मांडावेत आणि फळांची ओळख व्हावी यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला एक एक फळ देऊन त्या विषयी बोलायला सांगण्यात आले. पहिलीतल्या मुलांनी फळांचे आकार,रंग,चव या विषयीची माहिती सांगितली तर चौथीच्या विद्यार्थ्यांनी छोट छोटे प्रयोग प्रत्यक्ष करून अनुभव घेतला. चौथीच्या विद्यार्थ्यांनी ओव्या, भारुडे सादर केली. विद्यार्थ्यांच्या शारीरिक सुदृढतेकरिता व्यायाम, कवायत व मूल्यसंस्कारां करीता गोष्टी सांगण्यात आल्या.
टिळकनगर शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन साजरे
दिवसभरात कोणत्याही प्रकारचे पाठांतर, लेखनाचा अभ्यास मुलांनी केला नाही. फक्त खेळातून आणि कृतीतून ज्ञानार्जन केले. टिळकनगर बाल विद्यामंदीराच्या मुख्याध्यापिका विजया निरभवणे यांच्या मार्गदर्शनाखाली इतर सर्व शिक्षकांच्या सहकार्याने हा उपक्रम पार पडला. संस्थेच्या कार्यवाह अर्चना जोशी, सदस्या नितेश्री काबाडी, रूपाली साखरे यावेळी उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

——–
