ठळक बातम्या

विधिमंडळ पावसाळी अधिवेशन ४ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई दि.२७ :- महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे कामकाज ठरल्यानुसार येत्या ४ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे, अशी माहिती विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली. विधानभवनामध्ये कामकाज सल्लागार समितीच्या आज झालेल्या बैठकीत डॉ. गोऱ्हे बोलत होत्या.

राज्यात सरासरीच्या १०४ टक्के पाऊस पेरण्या ८५ टक्के….

मुंबईत आझाद मैदानात गिरणी कामगारांचे आंदोलन सुरू असून त्याबाबत विधिमंडळात बैठक आयोजित करण्यात यावी अशी सूचनाही डॉ. गोऱ्हे यांनी केली. बैठकीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *