मोडक सागर तलाव ओसंडून वाहू लागला !
मुंबई दि.२८ :- मुंबईला पाणीपुरवठा करणारा मोडकसागर तलाव गुरूवारी रात्री ओसंडून वाहू लागला. मुंबईला पाणीपुरवठा करणा-या सात तलावांपैकी ओसंडून वाहू लागणारा मोडकसागर चौथा तलाव ठरला आहे.
शाश्वत आनंदप्राप्तीसाठी साधना आणि स्वभावदोष निर्मूलन आवश्यक – मिल्की अग्रवाल
या तलावाची कमाल पाणी साठवण १,२८,९२५ दशलक्ष लीटर आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महापालिकेच्या जल अभियंता खात्याकडून देण्यात आली. मोडकसागर तलाव गेल्या वर्षी १३ जुलै रोजी दुपारी ओसंडून वाहू लागला होता.
मुस्लिम समाजाच्या सशक्तीकरणात अंजुमन इस्लामचे योगदान उल्लेखनीय – राज्यपाल रमेश बैस
यंदाच्या पावसाळयात तुळशी तलाव हा भरून वाहू लागलेला पहिला तलाव ठरला. त्यापाठोपाठ विहार तलाव आणि तानसा तलाव बुधवारी भरून वाहू लागले आहेत.