शाश्वत आनंदप्राप्तीसाठी साधना आणि स्वभावदोष निर्मूलन आवश्यक – मिल्की अग्रवाल
‘धकाधकीच्या जगात शाश्वत आनंद मिळविणे’ या
विषयावर मॉरिशसमध्ये शोधनिबंध सादर
मुंबई दि.२८ :- नियमित आध्यात्मिक साधना केल्यास,स्वभावदोष आणि अहं निर्मूलनासाठी सतत प्रयत्न केल्यास आपल्या सर्व समस्यांवर मात करता येते आणि आपल्याला शाश्वत सुखाची अर्थात् आनंदाची अनुभूती घेता येते, असे प्रतिपादन ‘महर्षी अध्यात्म विश्वविद्यालया’च्या कु. मिल्की अग्रवाल यांनी सांगितले.
शिरीष कणेकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
‘इमोशनल वेल बिइंग इन्स्टिट्यूट’ने (इ.डब्ल्यू.बी.आय.) मॉरिशस मुक्त विद्यापीठ, रॅदुइ आणि मिडलसेक्स युनिव्हर्सिटी, मॉरिशस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ‘फर्स्ट इमोशनल वेल बिइंग इंटरनॅशनल कॉन्फरन्स’मध्ये त्या बोलत होत्या. ‘धकाधकीच्या जगात शाश्वत आनंद मिळवणे : आध्यात्मिक संशोधनातून अंतर्दृष्टी’ या विषयावर त्यांनी ऑनलाईन शोधनिबंध सादर केला. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक डॉ. जयंत आठवले हे शोधनिबंधाचे तर शॉन क्लार्क सहलेखक आहेत.
मुस्लिम समाजाच्या सशक्तीकरणात अंजुमन इस्लामचे योगदान उल्लेखनीय – राज्यपाल रमेश बैस
‘जी.डी.व्ही. बायोवेल’ या वैज्ञानिक उपकरणाचा वापर करून प्रयोगामध्ये ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ हा नामजप केवळ चाळीस मिनिटे केल्यानंतर कुंडलिनी चक्र एका रेषेत येऊन प्रचंड सकारात्मक ऊर्जा स्वत:कडे आकर्षित झाल्याचे आढळून आले. डॉ. आठवले यांनी सिद्ध केलेली स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया आणि मिठाच्या पाण्यात पंधरा मिनिटे पाय बुडवून बसण्याने शरीरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर काढण्यास साहाय्य होते, असे त्यांनी सांगितले.
