लडाखच्या त्रिशुल युद्ध स्मारकासाठी महाराष्ट्र शासनाकडून तीन कोटी रुपयाची मदत
मुंबई दि.२७ :- लडाख येथील त्रिशुल युद्ध स्मारकसाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीने तीन कोटी रुपयांचा धनादेश काल कारगिल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लेफ्टनंट जनरल एच. एस. कहलोन यांना सुपूर्द करण्यात आला.
सर्वसमावेशक आपत्कालीन व्यवस्थापन आराखडा तयार करण्याचे काम प्रगतीपथावर
विधीमंडळातील मुख्यमंत्र्यांच्या समिती कक्षात झालेल्या या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, आमदार श्रीकांत भारतीय आदी उपस्थित होते.
संघटित आणि असंघीटत क्षेत्रातील कामगारांच्या मागण्यांसाठी संघर्ष करणार – भारतीय मजदूर संघाचा निर्धार
त्रिशुल युद्ध स्मारकाच्या विकासासाठी मदत करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याचे लेफ्टनंट जनरल कहलोन यांनी सांगितले. आमदार भारतीय यांनी प्रास्ताविक केले.
