उबाठा’ गटाचे किरीट सोमय्या यांच्या विरोधात आंदोलन
मुंबई, दि. १८
भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे मुंबईत विलेपार्ले येथे आज आंदोलन करण्यात आले.
उबाठा कार्यकर्त्यांनी सोमय्या यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत त्यांच्या छायाचित्राला ‘जोडे मारा’ आंदोलन केले.
ज्या माजी खासदाराची चित्थफीत व्हायरल झाली त्याने अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त केली आहेत. म्हणून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त व्हावे, अशी आमची इच्छा नाही. मात्र, या चित्रफीतीची सत्यता बाहेर आलीच पाहिजे.
त्या महिलेने आरोप का केले? आम्हाला जी माहिती मिळाली ती खरी की खोटी? ते तपासून पाहावे, अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अनिल परब यांनी केली.
