‘भाविप’ आणि पु.ना.गाडगीळ आणि सन्स यांच्या संयुक्त विद्यमाने पोषक आहारासाठी विशेष उपक्रम
डोंबिवली, दि. १८
भारत विकास परिषद आणि पु.ना.गाडगीळ आणि सन्स यांच्या संयुक्त विद्यमाने गरजू महिला व बालकांसाठी पोषक आहार वाटप विशेष उपक्रमाला आजपासून सुरुवात झाली.
डोंबिवलीतील म्हात्रेनगर, क्रांतीनगर, त्रिमूर्ती वसाहत (सारस्वत कॉलनी), कचोरे गावातील हनुमान नगर वसाहत या चार ठिकाणी दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या वाटपास अधिक मास आरंभाच्या दिवशी सुरवात झाली. या सर्व वसाहतींमधील सुमारे ४०० कुटुंबांची पूर्वनोंदणी करण्यात आली होती.
घरातील लहान मुलांसाठी दररोज अर्धा लिटर दूधाचे मोफत वाटप दररोज सकाळी पुढील दोन महिने करण्यात येणार आहे.
भारत विकास परिषदेचे पदाधिकारी आणि सदस्य आज सकाळी दूध वाटपासाठी ठिकठिकाणी उपस्थित होते. उपक्रम प्रमुख खुशबू चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पद्मश्री गजानन माने, मंदार हळबे, विशू पेडणेकर आणि त्यांचे सहकारी मदत करत आहेत.
——
