ठळक बातम्या

अपुऱ्या पावसामुळे पेरण्या खोळंबल्या; सभागृहात चर्चा करण्याची विरोधी पक्षांची मागणी

मुंबई, दि. १७
जुलैचा तिसरा आठवडा उलटूनही राज्यात अनेक भागांमध्ये पाऊस नसल्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत. दुबार तिबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांसमोर निर्माण झाले आहे.

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू – चहापान कार्यक्रमावर विरोधकांचा बहिष्कार

राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही संकटाची वेळ आहे त्यामुळे विधानसभेतील कामकाज थांबवून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तातडीने चर्चा करण्याची मागणी स्थगन प्रस्तावाद्वारे काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत केली.

राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या कमी असेल तर विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे- जयंत पाटील

विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बाळासाहेब थोरात यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारला धारेवर धरले.

राज्य मंत्रिमंडळातील फेरबदलासह खातेवाटप जाहीर – विरोधानंतरही अजित पवार यांना अर्थमंत्रीपद

राज्यात वादळामुळे यावर्षी उशिराने मान्सुनला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत राज्यातल्या अनेक भागांमध्ये पन्नास टक्क्यांहून कमी पाऊस पडला आहे. परिस्थिती अत्यंत गंभीर असून, शेतकरी अक्षरशः हवालदिल झाला आहे.

शिवसेनेशी भावनिक युती तर राष्ट्रवादी काँग्रेससशी राजकीय मैत्री- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

याबाबत सरकारने ज्या पद्धतीने शेतकऱ्याला धीर देण्यासाठी दक्ष राहून मदतीच्या उपाययोजना करायला हव्या त्या केल्या जात नाही, असे थोरात यांनी सांगितले.

राज्याच्या सर्वांगीण औद्योगिक विकासासाठी शासन कटिबद्ध- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कमी पर्जन्यमानाच्या तालुक्यांमध्ये तर सुरुवातीला पेरण्या झाल्या परंतु नंतर पाऊसच न पडल्यामुळे दुबार आणि तिबार पेरण्यांमुळे शेतकरी आज कोलमडून पडलेला दिसतो आहे. मागील वर्षी अतिवृष्टी व वळवाचा पाऊस आणि उन्हाळ्यात झालेल्या गारपिटीची नुकसान भरपाई जाहीर करुनही शासनाने दिलेली नसल्याचे थोरात म्हणाले.

दीप अमावास्या – अग्नीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण !

बी बियाणे आणि खतांची परिस्थिती राज्यात गंभीर झालेली आहे. बोगस बियाणे बाजारात मोठ्या प्रमाणावर आल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. त्यासंदर्भात कारवाया करून शेतकऱ्यांना धीर द्यायचे सोडून सरकारच्या काही टोळ्या जिल्ह्यांमध्ये वसुली करत फिरत आहेत, असा आरोप थोरात यांनी केला.
—–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *