ठळक बातम्या

Maharashtra: शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक; विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब

मुंबई, दि. १७
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले, मात्र अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक झाले आणि विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

अपुऱ्या पावसामुळे पेरण्या खोळंबल्या; सभागृहात चर्चा करण्याची विरोधी पक्षांची मागणी

अधिवेशनाच्या सुरु झाल्यावर विरोधक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक झाले. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी विविध प्रश्न उपस्थित केले. त्यावर सत्ताधाऱ्यांकडून अपेक्षित उत्तर न मिळाल्याने विरोधकांनी विधानसभेतून सभात्याग केला.

राज्याच्या सर्वांगीण औद्योगिक विकासासाठी शासन कटिबद्ध- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

दिवंगत खासदार आणि माजी मंत्री गिरीश बापट, दिवंगत खासदार सुरेश उर्फ बाळूभाऊ नारायण धानोरकर, माजी आमदार शंकरराव लिंबाजीराव वाकुळणीकर (कोळकर), बाबुरावजी जसुजी वाघमारे, माजी आमदार रामचंद्र पुनाजी अवसरे यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले होते. विधानसभेत शोकप्रस्ताव सादर करण्यात येऊन त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या कमी असेल तर विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे- जयंत पाटील

दरम्यान संजय शिरसाट, समीर कुनावर, यशवंत माने, अमित जनक यांची विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात तालिका अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
—–

दीप अमावास्या – अग्नीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *