राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मुंबईत आगमन
मुंबई, दि. ६
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आज दुपारी मुंबईत नागपूर येथून मुंबई विमानतळावर आगमन झाले. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रपती मुर्मू यांचे स्वागत केले.
भारतीय सैन्याच्या तीनही दलांतर्फे राष्ट्रपती मुर्मू यांना मानवंदना देण्यात आली. आज रात्री राजभवन येथे त्यांच्या आगमनाप्रित्यर्थ स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
—–
