Thursday, August 20, 2026
Latest:
वाहतूक दळणवळण

मेट्रो २ अ, मेट्रो ७ मार्गिकांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची दैनंदिन संख्या दोन लाखांहून अधिक

मुंबई, दि. २९
दहिसर ते अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’ आणि ‘दहिसर ते गुंदवली मेट्रो ७’ या मार्गिकांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची दैनंदिन संख्या दोन लाखांहून अधिक झाली आहे. या दोन्ही मार्गिका महामुंबई मेट्रो संचलन महामंडळातर्फे (एमएमएमओसीएल) चालविण्यात येत आहेत.

दक्षिण मुंबईतील झोपडपट्टी परिसरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करुन पुनर्वापर करणार

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) ३३७ किमी लांबीच्या मेट्रो प्रकल्पातील ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ या मार्गिकांचा पहिला टप्पा एप्रिल २०२२ मध्ये तर दुसरा टप्पा १९ जानेवारी २०२३ रोजी सेवेत दाखल झाला.

मुंबई ट्रान्स हार्बर लिंकला अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देणार

पहिल्या टप्प्यात या मार्गिकांवरून दिवसाला सरासरी ३० हजार ५०० प्रवासी प्रवास करीत होते. मात्र दुसऱ्या टप्पा सेवेत दाखल झाल्यानंतर या दोन्ही मार्गिका पूर्ण क्षमतेने धावू लागल्या. जानेवारी २०२३ मध्ये प्रतिदिन प्रवासीसंख्या थेट १ लाख ६० हजारांवर पोहोचली. एप्रिल २०२२ ते जून २०२३ दरम्यान एकूण प्रवासीसंख्या तीन कोटींवर पोहोचली.

मुंबई किनारी रस्ते प्रकल्पातील बोगदे खणनाचा टप्पा ‘मावळा-टिबीएम’ यंत्राने पूर्ण

प्रवाशांचा मेट्रो प्रवास सुकर व्हावा यासाठी एमएमएमओसीएने एकात्मिक तिकीट प्रणालीअंतर्गत ‘मुंबई १ नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ सेवा सुरू केली आहे. या कार्डमुळे तिकिटासाठी रांगेत उभे रहावे लागत नाही.

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या ८० रेल्वेफेऱ्यांना पेण स्थानकात थांबा

या कार्डचा वापर बेस्ट बस प्रवासासाठी करता येत आहे. आतापर्यंत एक लाख १४ हजार १७१ प्रवाशांनी ‘मुंबई १ कार्डा’चा लाभ घेतला आहे.
—–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *