Thursday, August 20, 2026
Latest:
राजकीय

मुंबईत उद्या उबाठा गट आणि भाजपचा मोर्चा

मुंबई, दि. ३०
बृहन्मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारप्रकरणी ‘उबाठा’ गटाकडून उद्या (शनिवारी) मोर्चा काढण्यात येणार आहे. तर महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात बृहन्मुंबई महापालिकेत झालेल्या घोटाळ्यांमध्ये आरोपी असलेल्यांविरोधात कारवाई व्हावी, या मागणीसाठी भाजपतर्फेही उद्याच (शनिवारी)आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.

नरीमन पॉईंट येथील भाजपाच्या प्रदेश कार्यालयापासून मोर्चाची सुरूवात होणार असून बृहन्मुंबई पोलीस आयुक्त कार्यालय येथे मोर्चाची सांगता होणार आहे, अशी माहिती आमदार आणि भाजप मुंबई शाखेचे अध्यक्ष ॲड. आशिष शेलार यांनी दिली.
—–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *