Thursday, August 20, 2026
Latest:
गुन्हे-वृत

पोलिसांकडून ५० नशेबाजांवर कारवाई

डोंबिवली, दि. २७
पोलिसांकडून राबविण्यात आलेल्या नशामुक्त अभियान आणि जनजागृती मोहीमेत पोलिसांनी कल्याण डोंबिवलीतील ५० नशेबाजांवर धडक कारवाई केली.

सार्वजनिक ठिकाणी, वर्दळीच्या रस्त्यावर बस, रेल्वे स्थानक परिसर, रिक्षा वाहनतळ भागात उभे राहून सिगरेट ओढणे, तंबाखू खाणे, तंबाखूजन्य प्रतिबंधात्मक वस्तुंचे सेवन करणे काही जणांकडून केले जाते. अशा नशेबाजांच्या विरोधात पोलिसांनी विशेषतः मोहीमेत ही कारवाई केली.

मानपाडा, रामनगर, विष्णुनगर पोलिसांनी शहराच्या अनेक भागात सार्वजनिक ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थ खाणे, झाडाझुडपांचा आडोसा घेऊन गांजा ओढणा-यांवर कारवाई केली.
—–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *