मुंबईसह ठाणे, डोंबिवली, कल्याणमध्ये पावसाची हजेरी
मोसमी पाऊस उद्या मुंबईत दाखल होण्याची शक्यता
डोंबिवली, दि. २३
मुंबईसह ठाणे, डोंबिवली, कल्याण, बदलापूरमध्ये आज सकाळी पावसाने हजेरी लावली. मात्र काही वेळातच पाऊस गायब झाला.
२४ किंवा २५ जूनपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे.
सध्या मोसमी वाऱ्यांच्या प्रवासासाठी पोषक वातावरण तयार झाले असून मुंबईत उद्या २४ जून रोजी मोसमी पाऊस दाखल होईल, अशी शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे.
दरम्यान, मुंबईत पवई, बोरिवली, मुलुंड या परिसरात शुक्रवारी सकाळी पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली होती. मात्र उर्वरित मुंबईत कडक ऊन पडले होते.
———
