आदिपुरुष चित्रपटावर देशभरात बंदी घालावी – खासदार श्रीरंग बारणे यांची मागणी
मुंबई, दि. २२
‘आदिपुरुष’ चित्रपटात श्रीराम, हनुमान आणि रावण या तिघांनाही चुकीच्या पद्धतीने चित्रीत करण्यात आले आहे.
त्यामुळे हिंदु धर्मीयांच्या भावना दुखावल्या आहेत आणि नागरिकांमध्येही नाराजी आहे. त्यामुळे आदिपुरुष या चित्रपटावर देशभरात बंदी घालावी, अशी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केली आहे.
हा चित्रपट म्हणजे आपला इतिहास बदलण्याचे षडयंत्र आहे. हिंदू धर्मांची कथा पूर्णपणे चुकीच्या आणि अशोभनीय पद्धतीने सादर केली आहे. त्यामुळे या चित्रपटावर देशभरात बंदी घालावी आणि निर्माता, कलाकारांवरही कायदेशीर कारवाई करावी, असे बारणे यांनी म्हटले आहे.
केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर, सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांना पाठविलेल्या निवेदनात ही मागणी करण्यात आली आहे. बारणे हे शिवसेनेचे ( मुख्यमंत्री एकनाथ शिंदे) खासदार आहेत.
—-
