इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन नीलेकणी यांच्याकडून ‘आयआयटी’ मुंबईला ३१५ कोटींची देणगी
मुंबई, दि. २१
‘आयआयटी’ मुंबईत पायाभूत सुविधांची निर्मिती, उदयोन्मुख क्षेत्रातील संशोधनाला चालना देण्यासाठी इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन नीलेकणी यांनी ‘आयआयटी’ला ३१५ कोटी रुपयांची (३८.५ मिलियन डॉलर्स) देणगी दिली आहे.
नीलेकणी यांनीच एका ट्विटद्वारे ही माहिती दिली. आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. सुभाष यादव आणि नीलेकणी यांनी बंगळुरू येथे सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.
नीलेकणी यांनी आयआयटी मुंबईतून १९७३ मध्ये विद्युत अभियांत्रिकीची पदवी संपादन केली. ‘आयआयटी’ला माजी विद्यार्थ्याकडून मिळालेली ही सर्वांत मोठी देणगी आहे. या आधीही नीलेकणी यांनी ८५ कोटींची देणगी ‘आयआयटी’ मुंबईला दिली होती.
—-
