Thursday, August 20, 2026
Latest:
ठळक बातम्या

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात विज्ञान आणि नावीन्यता उपकेंद्र सुरू करणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. २१
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात विज्ञान आणि नावीन्यता उपकेंद्र सुरू करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष, ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. अनिल काकोडकर, राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यावेळी उपस्थित होते.
डॉ. काकोडकर यांनी आयोगाच्या कामकाजाबाबत तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सामाजिक -आर्थिक विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या नाविन्यपूर्ण कृती कार्यक्रमांची माहिती दिली.

जैव वैद्यकीय उपकरण निर्मिती उपक्रम व विविध प्रकल्प, बायोमेडिक पार्क, महाराष्ट्र जनुक कोष, अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी एमएसएमई आंतरवासिता उपक्रमांची विविध योजना आणि धोरणांशी सांगड घालण्याचेही यावेळी निश्चित करण्यात आले.
——

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *