राजकीय

आदिवासी आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करु नका- नाना पटोले

मुंबई, दि. २१
आदिवासी आश्रम शाळेतील वर्ग ३ व ४ च्या रोजंदारी व तासिका तत्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचे सरकारी पत्रक अन्यायकारक आहे. हे पत्रक रद्द करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

रोजंदारी व तासिका तत्वावरील कर्मचाऱ्यांना कामावर हजर करून घेऊ नये’, असे शासन पत्रक आदिवासी विभागाने २५ मे २०२३ रोजी काढले आहे.

शासनाचे हे पत्रक या कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारे आहे. हे कर्माचारी अत्यंत अल्प मानधनावर दुर्गम भागात काम करत असून शासनाने याचा सहानुभीपूर्वक विचार करावा आणि ते रद्द करावे, असे नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
———

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *