पिंपरी चिंचवड येथील क्रांतिकारक चापेकर बंधूंच्या स्मारकासाठी ४१ कोटींचा निधी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई दि.२०-
पिंपरी चिंचवड येथे साकारण्यात येणाऱ्या क्रांतिकारक चापेकर बंधूंच्या स्मारकासाठी ४१ कोटींचा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले.
‘ सह्याद्री’ अतिथीगृह येथे स्मारकाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. बैठकीला खासदार श्रीरंग बारणे, आमदार अश्विनी जगताप, पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखरसिंग, क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे गिरीश प्रभूणे आदी उपस्थित होते.
प्रभूणे यांनी स्मारकाच्या उभारणीच्या आतापर्यंतच्या वाटचालीचा आढावा सादर केला. स्मारकाच्या उदघाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित करण्यात आले असून त्यांनी मान्यता दिल्याचे सांगितले. पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखरसिंह यांनी स्मारकाच्या कामाचे सादरीकरण केले.
——
