पूर्व द्रुतगती महामार्ग, वागळे इस्टेट परिसरात यांत्रिक वाहनांद्वारे रस्त्यांची स्वच्छता
मुंबई, दि. २०
ठाणे महापालिकेने दोन यंत्र वाहने खरेदी केली असून या वाहनांद्वारे शहरातील पूर्व द्रुतगती महामार्ग, वागळे इस्टेट या परिसरात सफाई सुरू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या. वाहनांचे उदघाटन करण्यात आले.
अशा प्रकारची आणखी चार यंत्रे ठाण्यातील मोठ्या रस्त्यांची स्वच्छता करण्यासाठी घेण्यात येणार आहेत.
महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना शहरातील पाहाणी दौऱ्यादरम्यान रस्त्यांची साफसफाई चांगल्या प्रकारे होत नसल्याचे दिसून आले होते.
यानंतर त्यांनी ठेकेदारांना रस्ते सफाईच्या कामाचा दर्जा सुधारण्याचे आदेश दिले.
मात्र वारंवार सुचना देऊनही कामात सुधारणा होत नसल्यामुळे आयुक्त बांगर यांनी काही ठेकेदारांना नोटीसाही बजाविल्या होत्या.
—-
