‘तारक मेहता का उल्टा चश्मा’च्या निर्मात्यासह दोन जणांच्या विरोधात लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल
मुंबई, दि. २०
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’चा या मालिकेचा निर्माता असित मोदीसह दोन जणांच्या विरोधात पवई पोलिसांनी लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल केला आहे.
मालिकेतील एका अभिनेत्रीने केलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
असित मोदीसह ऑपरेशन हेड सोहेल रमाणी आणि कार्यकारी निर्माता जतिन बजाज यांच्याविरुद्ध लैंगिक शोषण आणि
विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
——-
