कोकण रेल्वे मार्गावर पावसाळी वेळापत्रक; गाड्यांचा वेग मंदावणार
मुंबई, दि. २०
कोकण रेल्वे मार्गावर पावसाळी वेळापत्रकाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. यामुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या ३७ गाड्यांचा वेग मंदावणार आहे.
पावसाळी वेळापत्रकानुसार गाड्यांचा वेग ४० ते ९० किलोमीटर प्रतितास असणार आहे. पावसाळ्यात प्रवास सुरक्षित व्हावा, यासाठी ही वेगमर्यादा लागू करण्यात आली आहे.
कोकण रेल्वे मार्गावरील सर्व धोकादायक ठिकाणी २४ तास गस्त घालण्यात येणार आहे.
—
