‘हिंदु राष्ट्रा’सह हिंदुहिताच्या मागण्या पूर्ण करणार्यांनाच हिंदूंचा पाठिंबा- डॉ. चारुदत्त पिंगळे,
फोंडा, दि. २०
संपूर्ण भारतात गोहत्याबंदी, धर्मांतरबंदी, हिंदूंच्या देवतांचा अपमान करणार्यांवर कठोर कारवाई, वक्फ आणि ‘प्लेसेस ऑफ वर्शिप’सारखे अन्यायी कायदे रद्द आदी हिंदुहिताच्या मागण्या घेऊन त्या पूर्ण करणार्या लोकप्रतिनिधींनाच आगामी लोकसभा निवडणुकीत हिंदूंचा जाहीर पाठिंबा असेल, असे प्रतिपादन हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक डॉ.चारुदत्त पिंगळे यांनी केले.फोंडा गोवा येथे सुरू असलेल्या हिंदू राष्ट्र अधिवेशनात डॉ. पिंगळे बोलत होते.
राजकीय पक्ष त्यांचे घोषणापत्र/जाहीरनामा जाहीर करतात, आता हिंदूंनी संघटितपणे हिंदुहिताच्या मागण्यांचे घोषणापत्र बनवून मते मागण्यासाठी घरी येणार्या लोकप्रतिनिधीकडे त्यातील मागण्या करायला हव्यात, असेही डॉ. पिंगळे यांनी सांगितले.
‘हिंदू इकोसिस्टम‘चे संस्थापक कपिल मिश्रा म्हणाले, २०२२ मध्ये श्रीरामनवमीच्या दिवशी दिल्लीतील जहांगीरपुरीमध्ये बांगलादेशी घुसखोर मुसलमानांनी बाँब, गोळ्या आणि दगड यांद्वारे हिंदूंवर हिंसक आक्रमण केले. या प्रकरणात अटकेत असलेला अन्सार याचा खटला सर्वाेच्च न्यायालयात लढण्यासाठी ‘जमियत उलेमा-ए-हिंद’ या संस्थेकडून लाखो रुपये देण्यात आले.
देशात अनेक ठिकाणी आतंकवादी आक्रमणात सहभागी असलेल्यांचे खटले ‘जमियत उलेमा-ए-हिंद’कडून लढवले जातात. या संस्थेकडे हा पैसा ‘हलाल’च्या माध्यमातून येतो. ‘केस कापणे’, ‘भाजी खरेदी’ आदी अनेक गोष्टींसाठी हिंदू अन्य धर्मियांना पैसा देत आहेत, तो पैसा ‘जमियत उलेमा-ए-हिंद’पर्यंत जातो आणि हाच पैसा आतंकवाद्यांचे खटले लढवण्यासाठी वापरला जातो.
त्यामुळे हिंदूंच्या रक्षणासाठी गावपातळीपासून राष्ट्रीय स्तरापर्यंत हिंदूंची सक्षम ‘इकोसिस्टम’ उभारणे अत्यावश्यक आहे.
गोवा येथील ‘कृपाल रूहानी फाऊंडेशन’चे कर्नल करतार सिंह मजीठिया यांच्या हस्ते ‘हलाल सर्टिफिकेशन : वैश्विक अर्थव्यवस्थेवर आक्रमण’ या ई-पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. नांदेड येथील गणाचार्य मठ संस्थानचे मठाधिपती डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य महास्वामीजी म्हणाले, वीरशैव लिंगायत हिंदूंचाच एक भाग आहे.
——-
