‘आयआयटी’ पदवी अभ्यासक्रमाच्या ‘जेईई अॅडव्हान्स्ड’चा निकाल जाहीर
मुंबई, दि. १९
इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’च्या (आयआयटी) पदवी अभ्यासक्रमाच्या संयुक्त प्रवेश परीक्षा-‘जेईई अॅडव्हान्स्ड’चा निकाल रविवारी जाहीर झाला.
‘आयआयटी’ प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या सर्व सात विभागांतील पहिल्या पाचशे उमेदवारांमध्ये हैदराबाद विभागातील सर्वाधिक उमेदवारांचा समावेश आहे.’आयआयटी’ मुंबई विभागात पहिल्या पाच जणांत शंकर, युवराज गुप्ता, चैतन्य माहेश्वरी, जस्त्य जरीवाला, सुमेध एस एस यांचा समावेश आहे. मुलींमध्ये आदिती सिंगने पहिला क्रमांक मिळविला.
यंदाच्या वर्षी आयआयटींमध्ये प्रवेश घेण्यासाठी १,८०,३७२ उमेदवारांनी प्रवेश परीक्षा दिली. त्यापैकी ४३,७७३ उमेदवार उत्तीर्ण झाले. हैदराबाद विभागाचा व्ही. चिद्विलास रेड्डी हा ३६० पैकी ३४१ गुण मिळवून देशात पहिला आला, तर याच विभागाची नायाकांती नागा भाव्याश्री २९८ गुण मिळवून मुलींमध्ये प्रथम आली.
सर्वसाधारण गुणानुक्रम यादीसाठी (सीआरएल) गेल्या वर्षीचा कट ऑफ १५.२८ टक्के होता, यंदा तो २३.८९ टक्के आहे.
—-
