गिरणी कामगार संघर्ष समितीतर्फे रविवारी गिरणी कामगारांचा मेळावा
मुंबई, दि. १९
गिरणी कामगार संघर्ष समितीतर्फे येत्या २५ जून रोजी दादर येथे गिरणी कामगारांच्या घरांचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी एका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. गेली २२ वर्षे हा प्रश्न रेंगाळत पडला आहे.
दादर (पूर्व) येथील शारदा मंगल कार्यालय, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय येथे सकाळी साडेदहा वाजता हा मेळावा होणार आहे.
मेळाव्यात गिरणी कामगार सहनियंत्रण समितीचे अध्यक्ष आमदार सुनील राणे यांच्यासह अन्य वक्ते मार्गदर्शन करणार आहेत.
उर्वरित दीड लाख गिरणी कामगारांना घरे देण्यासाठी धोरण जाहीर करावे, कोन (पनवेल) मधील घरांचा ताबा देण्यातील अडचणी दूर कराव्यात, सोडतीसाठी उपलब्ध घरांची दुरुस्ती करत सोडत काढावी, घरांचा ताबा देण्यास वेग द्यावा आदी प्रलंबित मागण्या आणि त्यांची पूर्तता करण्यासाठी पुढील आंदोलनाची दिशा काय असावी, यावर मेळाव्यात चर्चा होणार आहे.
—-
