Thursday, August 20, 2026
Latest:
शैक्षणिक

मुंबई विद्यापीठाच्या प्र कुलगुरूपदी डॉ. अजय भामरे यांची नियुक्ती

मुंबई, दि. १९
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेने मुंबई विद्यापीठाच्या प्र-कुलगुरुपदी डॉ. अजय भामरे यांची नियुक्ती केली. डॉ. भामरे सध्या भांडुप येथील रामानंद आर्या डी.ए.व्ही महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत.

शिक्षण क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव असणाऱ्या डॉ. भामरे यांनी मुंबई विद्यापीठाचे प्रभारी प्र-कुलगुरू, वाणिज्य व व्यवस्थापन विभागाचे प्रभारी अधिष्ठाता, अधिसभा, व्यवस्थापन परिषद, विद्या परिषद, अधिष्ठाता मंडळ आणि मुंबई विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांवर काम केले आहे.
—–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *