विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर राष्ट्रवादी काँग्रेस दावा करणार?
मुंबई, दि. १९
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या विधानपरिषदेतील आमदार मनीषा कायंदे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे उबाठा गटाचे विधान परिषदेतील संख्याबळ कमी झाले आहे.त्यामुळे आता विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेतेपदावर राष्ट्रवादी काँग्रेस दावा करणार आहे.
विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे तर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद उबाठा गटाकडे आहे. कायंदे यांनी उबाठा गटाला सोडचिठ्ठी दिल्याने उबाठा गटाचे विधान परिषदेतील संख्याबळ कमी झाले आहे.
त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर दावा करणार का? असा प्रश्न प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांना प्रश्न विचारला त्यावर स्मितहास्य करून पवार म्हणाले, तुम्ही हे आमच्या लक्षात आणून दिल्यामुळे आम्ही निश्चितपणे यावर विचार करू.
विधान परिषदेत उबाठा गटाकडे दहा, शिंदे गटाकडे एक तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे नऊ आमदार होते.विधानपरिषदेत उबाठा गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांकडे प्रत्येकी नऊ आमदार झाले आहेत. उबाठा गटाचे अंबादास दानवे सध्या विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आहेत.
—–
