धावत्या उपनगरी लोकलमध्ये तरुणीवर बलात्कार, आरोपीला अटक
मुंबई, दि. १५
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पनवेलकडे जाणा-या उपनगरी लोकलच्या डब्यात एका तरणीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळी घडला. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीला अटक केली आहे.
महिलांच्या डब्यातून ही तरुणी एकटीच प्रवास करत असताना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मशिद या स्थानकांदरम्यान ही घटना घडली. पिडित तरुणी बेलापूरला जात होती. या प्रकरणी त्या तरुणीने रेल्वे सुरक्षा दलाकडे तक्रार दाखल केली होती.
रेल्वे सुरक्षा दल, मुंबई पोलिसांनी तपास करून आरोपीला अटक केली आहे. आरोपी रोजंदारीवर काम करणारा मजूर असून त्याच्यावर बलात्काराच्या आरोपासह भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
——
