Thursday, August 20, 2026
Latest:
ठळक बातम्या

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीनंतर आकाशवाणी पुणे केंद्रातील वृत्त विभाग बंद करण्याचा निर्णय मागे

आकाशवाणी पुणे केंद्रावरुनच बातमीपत्रे प्रसारित होणार
मुंबई, दि. १५
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीनंतर आकाशवाणी पुणे केंद्रातील वृत्त विभाग बंद करण्याचा निर्णय प्रसार भारतीने मागे घेतला आहे. या केंद्रावरुनच यापुढे बातमीपत्रे प्रसारित होणार असल्याचे आदेश प्रसारभारतीने आज जारी केले.

पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग १९ जूनपासून बंद करण्याचे आदेश प्रसारभारतीने काढले होते. या आदेशाविरुद्ध सर्वत्र तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती.

याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळताच त्यांनी त्यांच्या अपर मुख्य सचिवांना सूचना देऊन केंद्रातील अधिकाऱ्यांकडे आकाशवाणीचा वृत्त विभाग सुरू ठेवावा, अशी विनंती करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्या मागणीवर सकारात्मक निर्णय घेत प्रसारभारतीने यापुढे पुणे प्रादेशिक वृत्त विभागातूनच बातमीपत्र प्रसारित होतील, असे आदेश काढले.

सकाळी ७.१०, ८ वा. ८.३०, १०.५८, ११.५८ आणि संध्याकाळी ६ वाजताची बातमीपत्रे पुणे केंद्रावरुनच प्रसारित होणार आहेत.
दरम्यान या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांचे आभार मानले आहेत.

खासदार प्रकाश जावडेकर, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही अनुराग ठाकूर यांना पत्र लिहून आकाशवाणी पुणे केंद्रातील वृत्त विभाग बंद करण्याचा निर्णय मागे घ्यावा अशी विनंती केली होती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *