धर्म संस्कृती

हिंदू जनजागृती समितीचे गोव्यात ११ वे अखिल भारतीय हिंदू राष्ट्र अधिवेशन

मुंबई, दि. १२
हिंदू जनजागृती समितीतर्फे येत्या १६ ते २२ जून या कालावधीत गोवा येथे अखिल भारतीय हिंदू राष्ट्र अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ते सतीश कोचरेकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.

फोंडा, गोवा येथील श्री रामनाथ देवस्थान येथे हे अधिवेशन होणार आहे.‌
या अधिवेशनाला अमेरिका, इंग्लंड, इंडोनेशिया, सिंगापूर, बेल्जियम, बांग्लादेश आणि नेपाळ या देशांसह भारतातील २८ राज्यांतील ३५० हून अधिक हिंदू संघटनांच्या सुमारे दीड हजारांहून अधिक प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले असल्याचे कोचरेकर यांनी सांगितले.‌

अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण हिंदू जनजागृती समितीच्या HinduJagruti.org या संकेतस्थळावर तसेच समितीच्या HinduJagruti या ‘यु-ट्यूब’ चॅनेलवर केले जाणार आहे, असेही कोचरेकर म्हणाले.

यंदाच्या अधिवेशनामध्ये ‘हिंदु राष्ट्र संसद’ या वैशिष्ट्यपूर्ण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. विविध विषयांवरील परिसंवाद, विशेष कार्य करणार्‍या मान्यवरांच्या मुलाखती होणार आहेत. ‘लव्ह जिहाद’, ‘हलाल सर्टीफिकेशन’, ‘लँड जिहाद’, ‘काशी-मथुरा मुक्ती’, ‘धर्मांतर’, ‘गोहत्या’, ‘गड-किल्ल्यांवरील इस्लामी अतिक्रमणे’, ‘मंदिर संस्कृतीचे रक्षण’, ‘काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन’, ‘पाकिस्तान आणि बांगलादेश येथील हिंदूंवरील अत्याचार’ इत्यादी विषयांवरही विचारमंथन होणार आहे, अशी माहिती
सनातन संस्थेच्या धनश्री केळशीकर यांनी दिली.‌

परशुराम तपोवन आश्रमाचे संस्थापक भार्गवश्री बी.पी.सचिनवाला, केरलीय क्षेत्रपरिपालन समितीचे आचार्य पी.पी.एम.नायर, हिंदू गोवंश रक्षा समितीचे समन्वयक दिप्तेश पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.
—-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *